(रत्नागिरी)
तालुक्यातील कुर्धे परिसरात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची १० लिटर दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या वृद्धाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, दि. २१ जानेवारी रोजी रात्री ८.४५ वा. करण्यात आली.
दिनकर रामचंद्र म्हादये (७०, रा. मेर्वी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस नाईक सुदेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी रात्री संशयित हा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ५१० रुपयांची १० लिटर गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम क ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.