( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील ओरी-बोरवाडी येथे पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या रागातून प्रौढाला मारहाण करण्यात आली. ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय संजय गुरव (वय २०) व संदेश संजय गुरव (वय २६, रा. ओरी बोरवाडी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश भिकू गुरव (वय ५३, रा. ओरी, बोरवाडी) हे बोरवाडी येथे पायवाटेने घरी जात होते. त्यावेळी संजय गुरव यांच्या घरातील कुत्रा प्रकाश यांच्या अंकावर भुंकू लागला. यावेळी प्रकाश यांनी कुत्र्याला दगड मारला. याचा राग मनात धरुन जय गुरव हा घरातून बाहेर धावत आला. त्याने प्रकाश यांना जमिनीवर पाडून मारहाण केली. संदेश गुरव याने प्रकाश यांच्या कपाळावर दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी प्रकाश गुरव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.