(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीकच्या राजीवडा येथे किरकोळ वादातून तरूणावर चाकू हल्ला करणाऱ्या चौघांवर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान गफार पकाली, असलम फणसोपकर, खिजर इम्तियाज बस्ता व रियाना गफार पकाली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबतची तक्रार मोहसिन नूरमोहम्मद फर्मसोपकर ( ३५ , राजीवडा रत्नागिरी ) या जखमी तरुणाने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिन व संशयित आरोपी यांच्यात फळ विक्रीच्या टेबलवरून वाद झाला होता. यातून २८ एप्रिल रोजी मोहसिन संशयितांना जाब विचारण्यासाठी गेले होते. याचा राग येवून संशयित आरोपींनी चाकू व लाकडी दांड्याने मोहसिनवर हल्ला केला, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.