(खेड)
खेड तालूक्यातील कालिकामाता विकास मंडळ गाव साखर चौकीचीवाडी तर्फे दि. ७ ते ९ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी बत्तीस संघापैकी प्रथम क्रमांकाचे मानकरी मुसाड चांदेवाडी, द्वितीय क्रमांक शंभूराजे बोरज, तृतीय क्रमांक वावे चिंचाटवाडी, चतुर्थ क्रमांक मराठा ११ साखर बामणवाडी या संघाना देण्यात आले. तर शिस्तबद्ध संघ जय गणेश पोसरे मालीकावीर मदन चांदे मुसाड, उत्कृष्ट फलंदाज सनी चव्हाण बोरज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अथर्व (बिट्टू) उतेकर, उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रतिक उतेकर चौकीचीवाडी यांना देण्यात आले.
कालिकामाता विकास मंडळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धांमध्ये पंधरागाव विभागात प्रथमच पन्नास हजाराचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आल्याने तालुका, जिल्ह्यातून स्पर्धा आयोजकांचे भरभरून कौतुक होत आहे. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले कि, मंडळातर्फे सर्व खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे रोख रक्कम एक लाखाचे असेल आणि या स्पर्धांमधूनच कुशल खेळाडूंची निवड करून एक उत्तम संघ बनविला जाईल. तसेच आपल्या मंडळाचे, गावचे नाव तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात कसे होईल यासाठी आमचे मंडळ सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी उपस्थित साखरगाव ग्रामीण अध्यक्ष काशिराम उतेकर, मा.उपसभापती संतोष उतेकर, साखर ग्राम विकास मंडळ मुंबई अध्यक्ष शिवाजीराव उतेकर, कार्याध्यक्ष कृष्णा उतेकर, पंधरागाव असोसिएशन अध्यक्ष दिलीप उतेकर, गुहागर विधानसभा प्रवक्ते संजय रेवणे, शाखाप्रमुख संतोष उतेकर, बळीराम उतेकर, दगडू उतेकर, विष्णू उतेकर, नाना उतेकर, नाना पार्टे, दिपक उतेकर, वासूदेव चव्हाण, सुनिल उतेकर, शशीकांत उतेकर, अनिल उतेकर, विश्वास मोरे, अनंत उतेकर, अंकुश उतेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, क्रिकेट संघातील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरज रेवणे, प्रफुल्ल उतेकर, प्रतिक उतेकर, सुशांत उतेकर, सुभाष उर्फ पप्पीभाई उतेकर, मंगेश उतेकर, धोंडू उतेकर, सुरज निकम, शत्रुघ्न मोरे आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धांचे समालोचन विनायक जाधव, सुरज रेवणे यांनी केले. युटूबवर थेट प्रक्षेपण अजित उतेकर यांनी दाखवले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष उतेकर उपसभापती यांनी केले. तर उपस्थितांचे तसेच देणगीदारांचे आभार मंडळाचे सचिव मनोहर उतेकर यांनी मानले.