(संगलट / वार्ताहर)
कारसाठी रोख रक्कम देऊन लोन करून देखील गाडीचा ताबा अद्यापि न देता फसवणूक करणाऱ्या एकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २३ सप्टेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधी मध्ये लवेल व खेड येथे घडला. हुसेन मोहम्मद हनिफ परकार (रा. खेड जि. रत्नागिरी) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर सुनिल जनार्दन देशमाने (वय ५३ वर्ष रा. सात्वीनगाव माळवाडी ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांना मौजे लवेल व खेड या ठिकाणी हुंडाइ कंपनीची क्रेटा १४ सी आर. डी. आय एस प्लस क्र एम. एच.०८ ए. जी १९७० पांढ-या रंगाच्या गाडीचा व्यवहार ठरवुन एकुण रुपये ८,५०,०००/- रु रक्कमपैकी ०१,७०,००० रुपये रोख रक्कम व ०६,८०,००० रुपये लोन करुन गाडी विकत दिली. परंतु सदर गाडीचा ताबा न देता कौटुंबिक कारणासाठी चार दिवस वापरतो गाडी लागणार आहे असे सांगून गाडी अद्यापि दिला नाही. फिर्यादी यांनी त्यांना गाडीचा ताबा द्यावा अशी विनंती केली. परंतु त्यांनी फिर्यादी यांना अजुन दोन दिवसांनी देतो असे सांगितले. त्यांनतर फिर्यादी यांनी त्यांना वारंवार संपर्क करुन गाडीचा ताबा देण्याची मागणी केली असता त्यांनी फिर्यादी यांना आज देतो उद्या देतो असे सागुन अद्याप पर्यंत गाडी परत दिलेली नाही व फसवणूक केली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 24/2024 व भादवी कलम 420.406गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.