(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कारवांचीवाडी परिसरात नवीन वसाहत निर्माण झाली आहे. याठिकाणी तालुक्यामधील व तालुक्याबाहेरील अनेक धम्म बांधव एकत्र राहतात, एकमेकांच्या सुख-दुःखात समाविष्ट होत असतात. या एकत्रीकरणाला धार्मिक बंधनात राहता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्थेमार्फत धम्मदीक्षा दिली त्या संस्थेची शाखा स्थापन केली.
डॉ. बाबासाहेबांच्या घराण्यावर विश्वास व प्रेम असल्याने बाबासाहेबांच्या घराण्यासोबत कायम राहून आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर आद. भीमराव आंबेडकर, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्य चालणाऱ्या ३४ राज्याप्रमाणे आपणही भारतीय बौद्ध महासभेचे कार्य पुढे चालवण्यासाठी सज्ज होऊया, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. २६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय बौद्ध महासभेची कारवांचीवाडी येथे शाखेची स्थापना करण्यात आली.
या शाखा स्थापन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हा संघटक विजय जाधव तसेच तालुकाध्यक्ष विजय मोहिते, तालुका कोषाध्यक्ष तुषार जाधव, आदी उपस्थित होते.
शाखा कार्यकारणी जाहीर
भारतीय बौद्ध महासभा कारवांचीवाडी नवीन वसाहत कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष मंगेश मोहिते, उपाध्यक्ष विलास तायडे, सरचिटणीस कमल तांबे, कोषाध्यक्ष अशोक तांबे, उपाध्यक्ष संतोष पवार, राजेश जाधव, अनंत जाधव, विनोद कांबळे, प्रेमदास कांबळे, बळीराम गवळी, अनिल मोरे, निलेश गमरे, मानसी कदम, प्रमोदिनी जाधव, अनुष्का मोरे प्रिया पवार, अंकिता जाधव, वैशिता गमरे ,सीमा तायडे, स्वाती जाधव, सुरेखा मोहिते या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.