(रत्नागिरी)
जिल्ह्यात कामगार कल्याण केंद्राशी सलग्न असणाऱ्या कामगारांनी जून २०२३ किंवा डिसेंबर २०२२ च्या पगारातून ज्या कामगारांच्या पगारातून १२ रुपये कल्याण निधी (एलडब्लूएफ) जात आहे. अशा कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे आर्थिक लाभाच्या योजना ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत.
कामगारांसाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती साठी अंतिम ३१ ऑक्टोबर २०२३, एमएससीआयटी अनुदान अंतिम ३१ डिसेंबर २०२३ परदेश शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अंतिम ३१ ऑक्टेबर आहे. पाठ्यपुस्तक अनुदानासाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर, क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबर, तर युपीएससी व एमपीएससी प्रवेश परीक्षा उत्तीर्णांना शिष्यवृत्तीसाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.
पीएचडी शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम तारीख आहे. गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. कामगार व कुटुंबातील सदस्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी www.public.mlwb.in पोर्टलवर जाऊन सभासद नोंदणी करणे खाली फोनवरुन सभासद अप्रुव्ह करून घेणे, योजनेचा अर्ज भरणे या बाबी पूर्ण कराव्यात. याबाबत सविस्तर माहितीसाठी संस्कृती शिंदे, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका, कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे संपर्क साधावा