(रत्नागिरी)
मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगाऊ ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक बाबु तांडेल, असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ मार्च ते ८ नोव्हेंब र २०२३ या कालावधीत रत्नागिरीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नासीर अब्दुल गनी वाघू यांनी संशयित दीपक तांडेल याला २०२३-२४ वर्षाकरिता मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगाऊ ५ लाख ४० हजारांची रक्कम दिली होती; मात्र संशयित स्वतः व इतर कामगार यांच्यासह कामावर आले नाही, तसेच दिलेली रक्कम ही परत न करता फसवणूक केली.
याप्रकरणी नासौर वाचू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.