(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव येथे आजाराला कंटाळून वृद्धाने गोठ्यातील वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 ते 4 वा. कालावधीत घडली आहे.
गोविंद भिकू पवार (75, रा.कापडगाव शिंदेवाडी, रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते पायांना सूज येणे, चालताना त्रास होणे आणि ब्लड प्रेशरच्या आजाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळून त्यांनी गोठ्यातील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.