(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील काजरेकोंड गोताडवाडी येथील प्रौढाचा आंब्याच्या कलमाची फांदी तोडताना तोल जावून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 23 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास घडली. देवजी जानू गोताड (50, रा. गोताडवाडी, काजरेकोंड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत देवजी गोताड हे चुलत पुतण्यासोबत जुवे येथील कीर यांच्या बागेतील नारळ झाडे तसेच कलमाची झाडे साफसफाई करण्यासाठी गेले होते. यावेळी गोताड हे आंबाच्या कलमावर चढून फांदी तोडत असताना तोल जावून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या पुतण्याने लगेचच रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून देवजी गोताड हे मयत असल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद सखाराम गोताड (60, काजरेकोंड) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.