तौक्ते चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे चिपळुनात जोरदार स्वागत झाले. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विशेष म्हणजे शनिवारी रात्री उशिरा १२.३० वाजता असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने नाना पटोले भारावून गेले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ते आश्चर्यचकित देखील झाले.
तौक्ते चक्री वादळाने रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे गोठे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहेत. महावितरणचेदेखील नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे शनिवारी रात्री उशिरा चिपळुनात आगमन झाले. चिपळूण बहादुरशेखनाका येथे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जबले, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, शकील तांबे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, चिपळूण शहर अध्यक्ष फैसल पिलपिले, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, शहर उपाध्यक्ष मनोज दळी, युवक जिल्हा सरचिटणीस व शिरळ ग्रामपंचायत सदस्य गुलजार कुरवले, बंड्या साळवी, साजिद सरगुरोह, मुबिन आलेकर, सेवादल तालुकाध्यक्ष अश्फाक तांबे, संजय पाटील, सिकंदर नायकवडी, दीपक पवार, सुरेश मांदडकर, विजय चिले, यश पिसे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी साजिद सरगुरोह यांची चिपळूण काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले.
तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या आईचे निधन झाले असल्याने त्यांच्या घरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्री. यादव कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी सौ. स्वप्ना यादव, कु. स्वामिनी यादव आदी उपस्थित होते.