(जाकादेवी वार्ताहर)
वाटद जिल्हापरिषद गटातील कळझोंडी गाणसुरवाडी येथे पावसाळ्यात वादळीपाऊस झाला होता.त्यामध्ये या गावातील महत्वाचा गावात मध्यभागी असलेला कायमच गावातील लोकांना ये जा व वाहतूक करण्यासाठी नदीला बांधलेला पुल वाहून गेला त्यामुळे लोकांचे खूपच हाल होत होते. तात्पुरती व्यवस्था म्हणून येथील ग्रामपंचायत व जि. प.सदस्या सौ.ऋतुजा जाधव आणि सौ.मेघना पाष्टे पंचायत समिती सदस्या यांचे सहकार्यातून बायपास पुल तात्पुरती व्यवस्था झाली होती. परंतु गाड्या जाऊ शकत नव्हत्या.लोकांची अडजण दूर व्हावी म्हणून ना.उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाने व अण्णा सामंत, भैयाशेठ सामंत यांचे सहकार्यातून तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य व या विभागाच्या जि.प.सदस्या माजी सभापती समाज कल्याण समिती सौ.ऋतुजा जाधव यांच्या माध्यमातून या नदीवरील पुलासाठी सदतीस लाख रुपये मंजूर केले.
सर्वप्रथम जि.प. माजी सदस्य,अर्थ व शिक्षण माजी सभापती कै.शरदशेठ बोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर या पुलाचे भूमीपूजन रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष बंड्याशेठ उर्फ प्रदीप साळवी यांचे हस्ते करण्यात आले. या गावातील ग्रामस्थ व मुंबईतील तरुण यांनी खूप मेहनत घेऊन भूमी पूजनाचा अतिशय देखणा कार्यक्रम केला.त्याबद्दल बंड्याशेठ यांनी समाधान व्यक्त केले. कळझोंडी गावातील आणखी इतर महत्वाच्या रस्त्यांना चाळीस लाख रुपये मंजूर आहेत असेही त्यांनी सांगितले तर काही रस्त्याची कामे सुरूही आहेत. येथील वरवडे गणाच्या पंचायत समिती सदस्या माजी सभापती सौ.मेघना पाष्टे यांच्याही कामाचे त्यांनी कौतुक केले. तर लोकांची उपस्थिती व एकजूट पाहून त्यांनी समाधान व्यक्त करून कळझोंडी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. शिवसेनेमार्फत चाललेल्या कामांच्या झंझावातबाबत ग्रामस्थांनी कौतुक व्यक्त केले.या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी बंड्याशेठ साळवी, तालुका प्रमुख,राजू साळवी, उपतालुका प्रमुख, पंचायत समिती सभापती सौ.संजना माने, जि.प.सदस्या सौ.ऋतुजा जाधव, प.स.सदस्या सौ.मेघना पाष्टे, प.स.सदस्य अभयशेठ खेडेकर, उपविभाग प्रमुख नामदेव चौघुले, सरपंच सौ. दीप्ती वीर, उदय माने विभाग संघटक, ग्रा.प.सदस्य सहदेव वीर, सूर्यकांत बंडबे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक वीर, रत्नागिरी तालुकाशाखा अध्यक्ष शाहीर झराजी वीर, राजेश जाधव, युवा अध्यक्ष अंकुश वीर, मधुकर फडकले, दिलीप फडकले, गणेश पाश्ठे, नंदकुमार वीर, कमलाकर वीर, दत्ता वीर, गावकर भानू फडकले, सुरेश वीर, जनार्दन वीर, किशोर फडकले, यशवंत वीर, महादेव आग्रे, किशोर पवार, संतोष निंबरे, नरेश निंबरे, संजय शितप, यशवंत निंबरे, सहदेव महादेव वीर, महादेव पाष्टे, मुंबई युवा पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाखा प्रमुख अनिल फडकले यांनी यशस्वीपणे केले.