(मुंबई)
रेल्वे मार्गाने होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग अलर्टवर आहेत. हैद्राबाद येथून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयांची अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस दाखल होताच पोलिसांनी शिताफीने 5 जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 1 कोटी 1लाख 55 हजार रुपयाची रोकड आणि 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. गणेश मरिबा भगत, मयूर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटे व रोकड कोठून आली याचा तपास केला जात आहे.
आरोपींनी आपण कुरियर कंपनीसाठी काम करत असून हे कुरियर पोचवण्यासाठी आपण आल्याची माहिती दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याची तस्करी मागच्या रहस्याचा पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध सुरु आहे.