(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु.कल्याणी सचिन साठे हिने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी यांचे तर्फे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवली. पतपेढीच्या वर्धापन दिनानिमित्त या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
५ वी ते ७ वी पर्यंत च्या वयोगटातून तीने प्रथम क्रमांक पटकवला. कल्याणी ने सैनिकांचे आत्मवृत्त हा विषय सहा मिनिटात मांडला. या वयोगटातून ४८ स्पर्धक सहभागी झाले होते. कल्याणी ही माखजन इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल पूरक उपक्रमातील मुलगी असून तिला प्रशालेतील शिक्षक व वडील सचिन साठे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर, संस्था अध्यक्ष आनंद साठे आदींनी कौतुक केले आहे. तर परिसरातून कल्याणी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.