(रत्नागिरी)
सोमवारी सकाळी निवळी-जयगड रस्त्यावरील करबुडे फाटा येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील कार चालकाचा उपचारांदरम्यान रात्री कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. ओंकार प्रमोद साळवी (रा.वरची निवेंडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
ओंकार साळवी आपल्या ताब्यातील कार घेउन भरधाव वेगाने जात असताना करबुडे फाट्याजवळ ओंकारचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्या ट्रकला धडक देत अपघात केला होता.ही धडक इतक जोरदार होती कि,त्यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला तर ट्रकचा पुढील उजव्या बाजुचे चाक निखळले होते.यात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. परंतु उपचारांदरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.