रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी बाजारपेठ कन्टेंमेट झोन झाल्याने या बाजारपेठेतील सर्व दुकाने पाच दिवसांपासून बंद करण्यात आली असून केवळ वैद्यकीय सेवाच सुरू आहेत. जाकादेवी खालगाव परिसरामध्ये कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागात कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये यासाठी खालगाव ग्रामपंचायतीला वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ५ दिवसांपासून जाकादेवी मुख्य बाजारपेठ बंद असून केवळ अत्यावश्यक असलेली वैद्यकीय सेवाच फक्त सुरू आहे.
खालगाव जाकादेवी परिसरात ११० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण active असून सध्या ३३ पेक्षा अधिक रुग्ण या परिसरात पॉझिटिव्ह असल्याचे अलिकडच्या अहवालात दिसून आले. खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्यामार्फत खालगाव- जाकादेवी जास्त लोकवस्तीच्या परिसरात कोरोना टेस्ट सरसकट करण्यात आली. या टेस्टला जाकादेवी परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चार दिवसांत कंटेनमेंट झोन परिसरातील १४३७ पैकी सुमारे ११०० नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मोरताडे ,प्राथमिक केंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रशांत कांबळे, राजेश सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व स्टाफ, खालगाव ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, आशा , अंगणवाडी सेविका, मदतनीस, औषध निर्माता विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, सामाजिक बांधिलकी पत्करलेल्या सेवाभावी व्यक्ती या मोहिमेला मोलाचे सहकार्य करत आहेत.जाकादेवी खालगाव परिसरातील नागरिकांनी कोरोना संसर्गाला घाबरून जाऊ नये. दक्षता म्हणून स्वच्छता पाळणे, हात साबणाने धुणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क बांधणे, सामाजिक अंतर राखणे, सर्दी खोकला ताप अशी लक्षणे जाणवल्यास कोरोना टेस्ट करून घेणे, कोरोना लसीच्या मात्रा घेण्यासाठी पुढे येणे तसेच कोरोना संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे, खालगावचे युवा सरपंच प्रकाश खोल्ये,उपसरपंच कैलास खेडेकर, ग्राम कृती दलाचे प्रमुख माजी सैनिक मधुकर रामगडे, पोलीस पाटील प्रकाश जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल व बीट अंमलदार किशोर जोशी, हेड हेडकॉन्स्टेबल महेश खापरे यांनी केले आहे. खालगाव जाकादेवी परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या शून्य होत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !