(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी मधलीवाडी शाळेत भारत देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडाक्षेत्रात नैपुण्य संपादन केलेल्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री.दत्तात्रय उर्फ काका देसाई तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रथम श्री.काका देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी सुंदर यांचे भाषणे झाली. तसेच श्री दत्ता देसाई यांनीही सभेस संबोधित करत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशेद केले. आयोजित सभेत शाळेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
रोहन गुरव याने तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. तसेच तन्मय गावडे शुभम आलीम, रोहन गुरव, सार्थक गुरव यांचा कबड्डी तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागाबद्दल गौरविण्यात आले. तसेच रोहित गुरव ,कार्तिक गुरव, संभव शेवडे, सार्थक गुरव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. श्रद्धा बेर्डे, मनस्वी कुवार यांचा लंगडी संघात सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला. या वर्षातील उल्लेखनीय कामगिरी बाबत कुमारी पूजा राकेश शेवडे हिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री रविंद्र कुवार, श्री संजय वेलोंडे, श्री जनार्दन शेवडे, श्री सहदेव कुवार, श्री करिश्मा शेवडे, श्री मोहन देसाई,श्री रघुनाथ चरकरी, श्री राकेश शेवडे, श्री संतोष पड्याळ, श्री संदीप वेलोंडे, श्री मोहन आलिम, सौ करिष्मा शेवडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गोताड, श्री द्वारकादास दळवी श्री शिवराज अकोले व सौ.धानेश्वरी स्वामी इ.उपस्थित होते.
त्यानंतर दुपार सत्रात महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. या समारंभात बालमनावरील संस्कार या विषयावर उपक्रमशील शिक्षक श्री.माधव अंकलगे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ओरी मधलीवाडी व ओरी बोरवाडी मधील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.