( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावच्या तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी रमाकांत विष्णू देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रमाकांत देसाई यांचा लोकसंपर्क चांगला असून ते शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गावातील अनेक उपक्रमात ते हिरीरीने सहभाग घेत असतात. नुकत्याच झालेल्या सभेत श्री.देसाई यांची ओरी ग्रामस्थांनी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड केली आहे. या निवडीबद्दल नुतन अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे गावचे विद्यमान सरपंच आकांक्षा देसाई, उपसरपंच संकेत देसाई, सामाजिक कार्यकर्ते दत्ताशेठ देसाई, तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रमाकांत देसाई यांनी सांगितले.