( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद ओरी नं.१ या केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या पाककला स्पर्धा व रानभाज्यांचे प्रदर्शन अतिशय उत्साहात संपन्न झाले.
यावेळी ओरी केंद्राचे उपक्रमशील केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गावचे प्रभारी सरपंच संकेत उर्फ बंड्या देसाई ,माजी सरपंच श्रीम.आकांक्षा देसाई पाककला स्पर्धेचे परीक्षक ग्रामविकास अधिकारी श्री. घडशी, श्रीमती प्राजक्ता प्रशांत देसाई, तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक रामदास चव्हाण, गणपती पडुळे,तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.
पाककला स्पर्धा आणि रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे उपक्रमशील केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे यांनी विशेष कौतुक केले. या वर्षाप्रमाणे पुढील वर्षी व्यापक स्वरूपात प्रदर्शन भरवण्याचा मानस शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी पाककृती स्पर्धेचे अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले.विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत देसाई यांनी अभिनंदन केले.