(चिपळूण)
चिपळूणात ओरिसा येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल बुधवारी तिचा वाढदिवस होता. या वाढदिवसालाच तिने आत्महत्या का केली असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
धरित्री साहू (30, ओरिसा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. चिपळूनात ही नवरा बायको भाड्याने राहतात. तिचा पती लोटे एमआयडीसी येथे ड्युटीवर गेला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत तिने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पती ड्युटी संपवून घरी आला तेव्हा त्याने दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने पतीने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला.
दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये पाहतो तर पत्नी गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. त्याला मोठा धक्काच बसला. याबाबतची खबर चिपळूण पोलीस स्थानकात देण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.