(संगलट -खेड / इक्बाल जमादार)
मराठ्यांना ना आरक्षण, ना ओपन मधून संरक्षण आहे. सध्या घटनाबाह्य आरक्षण घेणारे सवलतीच्या जोरावर खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेला नसताना अतिक्रमण करणार व आरक्षणही घेणार अश्या परिस्थितीत मराठा तरुणांनी शैक्षणिक व शासकीय सेवेमधील प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी शासनाची असताना आपण काय भुमिका घेणार असा सवाल मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी विचारला असुन ओबीसी आरक्षण वाचवायला मराठा आरक्षणाचा बळी देणारे सर्वच राजकीय पक्ष ओपन मधुन अर्ज करणारेच ओपनमधून निवडले जावे असा कायदा का करत नाहीत असा सवाल भोसले यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षण मधील प्रलंबित असलेल्या नियुक्त्या आणि कायदेशीर धोरण राबविले जावे. खुल्या सर्वसाधारण प्रवर्गातील अतिक्रमण रोखणे या शिवाय मराठा आरक्षण रद्द झाल्यावर अडकलेल्या मराठा तरुणांच्या नियुक्त्या, होऊ घातलेली मेगा भरती व त्यामधील अन्याय दुर करुन योग्य प्रतिनिधित्व मराठा समाजाला मिळावे अशी मागणी मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे.