(चिपळूण /प्रतिनिधी)
ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्ली येथे ५ ऑगस्ट रोजी भव्य मोर्च्या आयोजित करण्यात आला आहे. सदरील आंदोलन राष्ट्रनायक माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या संदर्भातील निवेदन रासप जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी शिष्टमंडळासमवेत रत्नागिरी तहसीलदारांना नुकतेच दिले.
तरी या आंदोलनाचे निवेदन रत्नागिरी तहसिलदार कार्यालयात देण्यात आले. रासप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, युवा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पंकज नरवणकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सखाराम केशव गोरे, सौ. श्रुती शांताराम कोकरे आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.