(नवी दिल्ली)
ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलिसाने त्यांच्यावर रविवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नाबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाबा दास हे एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बृजराजनगरमध्ये आले होते.
एएसआय गोपाल दास असे गोळीबार करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. तो गांधी चौक पोलीस चौकीत तैनात होता. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नाबा दास यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात नाबा दास यांच्या छातीत ४-५ गोळ्या घुसल्या होत्या. या हल्ल्यानंतर नाबा दास यांना तातडीने विमानाने भुवनेश्वरला नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.