(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील मारळ व आंगवली तील सामाजिक युवा कार्यकर्ते दिनेश गुरव व अक्षय शिंदे यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. सदरचा पक्ष प्रवेश सोहळाभाजपा तालुका कार्यालयात संपन्न झाला.
या पक्ष प्रवेशासाठी भाजपा संगमेश्वर (दक्षिण) चे तालुकाध्यक्ष रूपेश कदम व आंगवली विभागप्रमुख विजय (बाबू) गुरव यांच्या प्रयत्नाने हे प्रवेश केले गेले. मारळचे दिनेश गुरव सह्याद्री कोकण युट्यूब चॅनेलचे संचालक असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारत विकासाकडे वाटचाल करत असून महाराष्ट्रातही गतीने विकास होत असून चांगला बदल घडतोय. म्हणूनच भाजपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करून जनसामान्यांचे कामे करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही प्रवेश केला आहे, असे गुरव यांनी सांगितले. संघटनेचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडतानाच अधिकाधिक युवा वर्गाशी संपर्क साधून त्यांना भाजपाची ध्येयधोरणे समजावून सांगत भाजपामध्ये प्रवेश करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तालुका भाजपाचे सुशांत मुळे, वैभव कदम यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.