तेजा मुळ्ये, रत्नागिरी
कधी नैसर्गिक असण्याला आपण भौतिक आशय शोधतो तर कधी भौतिक किंवा काल्पनिक असेल ते नैसर्गिक असल्याचे आशय शोधतो. याला कारण एकच जस आहे तस छान म्हणून सोडून देण्यापेक्षा त्यात आहे ते ठीक,,,, पण आपल्याला अजून काय दिसत? कसं वाटतय हे शोधण्याचा अट्टाहास,,,, आता मला त्याही पुढे जावं वाटतय आकाशातील चंद्र आपला वाटलं तरी तो कधीच आपल्या हातात येत नाही याची लहानपणापासून खात्री झालेली असते मग मला वाटलं आपण ते प्रतिबिंब पडलेलं शोधत होडीतून जाऊन आपल्या ओंजळीत घेऊ शकू का? सगळं हे जग आणि त्याचे दिसणे आभास आणि भास यांचा खेळ! तरीही त्यामागे जावं वाटतं,,, हा मूर्खपणा नाही हो,,, निसर्गातल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना कवेत घेण्याची अंतरिम इच्छा! बघा ना विचार करून झाडाच्या प्रतिबिंबापासून कितीसे अंतर,,,,जरा पुढे वाकून पाण्यात हात सोडून धरू जाता लगेच येईल चंद्र ओंजळीत!