(रत्नागिरी)
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकिंग इंडस्ट्रीमधील शिखर संघटनेने सर्व सहकारी बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती या प्रश्नावर देशव्यापी लढाईचे रणशिंग फुकले आहे. रत्नागिरीतही या संघटनेमार्पत बँक व्यवस्थापन व सरकारच्या धोरणाविरुद्ध एकजूट दाखवून, बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरीतील बैंक ऑफ इंडिया झोनल ऑफिस समोर, शिवाजी नगर, येथे हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या गुवाहाटी येथे पार पडलेल्या कार्यकारणी सभेत एकमुखाने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा करून त्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची तयारी केली. नोकर भरतीचा हा प्रश्न कामगारांच्या होत असलेल्या शोषणाच्या विरोधातील एका व्यापक लढाईचा भाग आहे. डिसेंबर महिन्यात बँक निहाय संप व जानेवारीत 2 दिवशीय देशव्यापी संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका गेली काही वर्ष क्लार्प व शिपाई यांची आवश्यक असणाऱया प्रमाणात पुरेशी भरती करत नाहीत. त्याचा सध्या बँकेत काम करत असणाऱया कर्मचाऱयांवर कामाचा वाढीव ताण पडत आहे. बँक व्यवस्थापन द्विपक्षीय करारातील कामाचे तास या तरतुदींचे उल्लंघन करून, कर्मचार्यांवर दबाव आणून विना मोबदला अधिक काम करण्यास सांगून त्यांचे हक्क नाकारत आहे. बँकातून काम करणाऱया कर्मचाऱयांना गरजेनुसार रजा घेणे, वेळेत काम संपवणे दुर्लभ झाले आहे. रोज उशिरा पर्यंत काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते. महत्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्तीसाठी ऊर फाटेपर्यंत धावणे हे या सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून आता नित्याचे झाले आहे. यामुळे कर्मचाऱयांवर कामाचा दबाव वाढला आहे. तणावात काम करावे लागत आहे. त्यांना शारीरिक, मानसिक रोगांना सामोरे जावे लागत आहे.
तर दुसरीकडे कायम करावयाची नियमित कामे कंत्राटी, टेम्पररी, आऊटसोर्सिंग करून अल्प मोबदला देवून करून घेत आहे. हे द्विपक्षीय करार व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन आहे. तसेच कामगारांचे शोषण आहे. यावर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकिंग इंडस्ट्रीमधील शिखर संघटनेने देशव्यापी लढाईसाठी या धोरणांना पहिला टप्पा विरोध करताना संघटनेने 1 ऑक्टोबर 2023 पासून आंदोलन छेडले आहे. नोकर भरती हि मागणी करून वेळेत व नियमानुसार काम, जादा न थांब (वर्प टू रूल) हे बॅच लावून सुरुवात केली. नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकसभेवर मोर्चा, धरणे, निदर्शन करण्यात येणार आहेत.
या आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीने रत्नागिरी शहरात धरणे आंदोलन, बाईक रॅली, मानवी साखळी, कॅण्डल मोर्चा”, त्यानंतर सायंकाळी शिवाजीनगर स्टॉप ते जिल्हाधिकारी कार्यालय ते बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस बाईक रŸली काढण्यात आली. बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस ते मारुती मंदिर संपूर्ण सर्पल अशी मानवी साखळी, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिस आणि मारुती मंदिर कŸण्डल मोर्चा काढण्यात आला. यामध्ये बहुसंख्येने कर्मचारी सहभागी झालेले होते.
एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा व्यवसाय वाढत आहे व कर्मचाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. 2019 साली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा व्यवसाय होता 147 लाख कोटी रुपये तर एकूण कर्मचारी संख्या होती 8.08 लाख ज्यात क्लार्प 2.95 लाख, शिपाई 1.24 लाख तर 2023 साली या बँकांचा व्यवसाय झाला आहे 204 लाख कोटी रुपये तर कर्मचारी संख्या 7.56 लाख ज्यात क्लार्प 2.77 लाख शिपाई 1.01 लाख म्हणजे एकीकडे व्यवसाय 77 लाख कोटी रुपयांनी वाढला आहे तर एकूण कर्मचारी संख्या मात्र 52 हजारानी घटली आहे. त्यातही क्लार्प ची संख्या 38 हजारानी तर शिपाई 23 हजारांनी घटली आहे. 2013 च्या तुलनेत एकूण कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे 1.20 लाखानी तर क्लार्प 77 हजारांनी तर शिपाई 52 हजारानी घटल्याचे सांगितले जात आहे.