(मुंबई)
MSRTC कडून पहिल्यांदा नॉन एसी स्लिपर कोच बस सुरू केल्या आहेत. एसटी ने या बसचे डिझाईन, मॅन्युफॅक्चर स्वतः केले आहे. मुंबई सेंट्रल ते बांदा आणि बोरिवली ते बांदा अशा दोन मार्गांवर ही बस चालवली जाणार आहे. बुधवार (4 ऑक्टोबर) रोजी या बससेवेचा श्रीगणेशा झाला. नजिकच्या काळात मुंबई आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या राज्य परिवहन मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर स्लिपर कोच बस या मुंबई-गोवा देखील चालवल्या जाणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते बांदा ही बससेवा पुणे, कोल्हापूर मार्गे जाणार आहे. या बसचं भाडं 1245 रूपये असणार आहे. महिलांसाठी हे भाडं 625 रूपये असणार आहे. संध्याकाळी 6.30 ला बस मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटणार आहे. तर बोरिवली- बांदा ही बस महाड, चिपळून मार्गावरून जाणार आहे. या बसचे भाडं 1169 रूपये असणार आहे. महिलांसाठी ते 585 रूपये असणार आहे. ही बस संध्याकाळी 7 वाजता सुटणार आहे. बांदा हा महाराष्ट्राचा शेवट मानला जातो.