(नवी दिल्ली)
उमरानच्या शानदार गोलंदाजीवर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उमरानचा एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ खेळाडूंच्या संघात समावेश करावा, असे शास्त्री यांचे म्हणणे आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिक यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असू शकतो, असा विश्वा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटतो आहे.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज असे वेगवान गोलंदाज सध्या विश्वचषक खेळण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघातील काही जागा निश्चित असल्यासारखे दिसत आहेत, परंतु काही जागा अशा आहेत जिथे कोण खेळणार हे योग्य वेळी ठरवले जाईल. उमरान भागीदारी तोडण्यात मास्टर आहे. या वेगवान गोलंदाजाने गेल्या ८ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत