(आरोग्य)
ऋतू कोणताही असो, मिठाई खाण्याचा आनंद काही औरच असतो. मात्र, उन्हाळ्यात थोडा निष्काळजीपणा सुद्धा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे शरीराला अपायकारक असते. अशा काही खास मिठाईंबद्दल माहिती घेऊ, ज्यांचा तुम्ही उन्हाळ्यात आनंद घेऊ शकता.
1. फालूदा
उन्हाळ्यात लोकांना फालूदा खायला आवडते. बाजारासारखा फालुदा घरीही बनवू शकता. यासाठी, आईस्क्रीम, सुकामेवा, नूडल्स, रोझ सिरप, दूध इत्यादींचा वापर केला जातो. तुम्ही उन्हाळ्याच्या आहारात त्याचा समावेश जरूर करा.
2. रस मलई
ही प्रसिद्ध बंगाली मिठाई ताजे पनीर किंवा छेनापासून तयार केली जाते. रस मलई अतिशय स्पंजी आणि सॉफ्ट असते. उन्हाळ्यात लंच किंवा डिनर नंतर या मिठाईचा आस्वाद घ्या.
3. आमरस
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. लोकांना उन्हाळ्यात हे फळ खायला आवडते. याचा वापर अनेक प्रकारच्या मिठाईमध्ये करू शकता. या मोसमात आंब्याचा वापर करून एक खास पदार्थ बनवला जातो, त्याला आमरस म्हणतात. आमरस बनवण्यासाठी दूध, साखर आणि पिकलेले आंबे वापरतात. उन्हाळ्यात जरूर करून पहा.
4. श्रीखंड
श्रीखंड ही महाराष्ट्राची पारंपारिक मिठाई आहे. हा गोड पदार्थ देशाच्या सर्व भागात सहज उपलब्ध होतो.
ते बनवण्यासाठी दही, साखर, सुकामेवा वापरतात. उन्हाळ्यात लोकांना मिठाईमध्ये श्रीखंड खायला आवडते.
5. गाजराची खीर
जर तुम्हीही मिठाईचे शौकीन असाल तर उन्हाळ्यात गाजराची खीर नक्की खा. तुम्ही ती सहज बनवू शकता.
ही खीर बनवण्यासाठी गाजर, दूध, साखर, सुकामेवा वापरतात. हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.