(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अक्षता सप्रे उपस्थित होत्या. डाॅ. सप्रे यांनी विद्यार्थ्यांना महिलांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे सांगितले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, महिला विकास कक्ष विभाग प्रमुख प्रा. सोनाली जोशी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राखी साळगावकर यांनी केले तर सौ. रिया बंडबे यांनी आभार मानले.