(पुणे)
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कॅम्प परिसरातील तीन दुकानांवर छापा टाकला आहे. यामध्ये एकूण २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणा तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
पुण्यात ई-सिगारेट आणि व्हॅपिंग उपकरणांचा वापर वाढत आहे. पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून अवैध तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. नुकत्याच एका घटनेत पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी कॅम्प परिसरातील तीन दुकानांवर छापा टाकला आहे. यामध्ये एकूण २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. तसेच या प्रकरणा तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याद्वारे माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पुणे कॅम्पमधील एम जी रोडवरील दुकानांची झडती घेतली. यावेळी तीन दुकांनामध्ये २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या तंबाखूजन्य ई-सिगारेट सापडल्या. पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहेत.
तसेच तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून जाहीरातीस प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनीयमन अधिनीयम २००३ व नियम २००४ चे कलम ७ (२), २० (२) तसेच इलेक्ट्रोनिक सिगारेट प्रतिबंध सुधारणा कायदा कलम २०१९ चे कलम ५ सह ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी जप्त केलेला माल लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.