जिल्ह्याला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. रुग्णालयासह कोरोना सेंटर अपूरी पडू लागली आहेत. व्हेंटिलेटर बेडसह ऑक्सिजन बेडची संख्या मार्यादीत आहे. अशाताच ऑक्सिजन बेडची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही असे रुग्ण हि आरोग्य यंत्रणेवर दबाव टाकून ऑक्सिजन बेड सोडायला तयार होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेडची अंत्यत गरज आहे. त्यांना ऑक्सिजन बेडची मिळत नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत.
गतवर्षीच्या तुलने यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेने जिल्ह्याला आपल्या विळख्यात घेतले आहे. दुसर्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. शिमगोत्सवानंतर कोरोना रुग्णांची यापुर्वीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. तर शासनाने निर्बंध लादल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल असे वाटत असताना प्रितदिन पाचशेच्या पटीत रुग्ण दररोजवाढत आहेत. याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर झाला आहे.
सध्या दरोरोज ५०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यातील तीस टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र ऑक्सिजन बेडमार्यादित असताना ज्या रुग्णांना ऑक्सिजन लावल्यानंतर ज्याची ऑक्सिजन लेव्हल नियमित झाली आहे. त्यांचे ऑक्सिजन काढण्याची सुचना डॉक्टर देतात मात्र ऑक्सिजन बेड घेतलेले अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड सोडायला तयारच होत नसल्याचे जिल्ह्यातील अनेक शासकिय रुग्णालयांमध्ये उघड होत आहे. ऑक्सिजन बेड कायम ठेवण्यासाठी वैद्यकिय अधिकार्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे नेमके करायचे काय ?असा प्रश्न डाॅक्टरांसमोर उभा राहिला आहे.
तर नव्याने येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेड कोठून द्यायचा ? तर ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने नवे ऑक्सिजन बेड कसे तयार करयाचे ? ऑक्सिजन बेडची आवश्यक असलेल्या रुग्णांचे करायचे काय ? अशा प्रश्नांच्या गर्तेत जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी अडकले आहेत. ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल नियमित झाली आहे. त्यांनी रुग्णालयांना सहकार्य करुन इतर आपल्या बांधवाना ऑक्सिजन बेडची उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर नातेवाईकांनीही इतर रुग्णांचा विचार करण्याची वेळ आली आहे.