आर्थिक मंदीच्या शक्यतेने जगभरातील कंपन्यांमध्ये २०२२ पासून नोकरकपातीचे सुरू झालेले सत्र अद्याप कायम आहे. मेटा (Facebook)-ट्विटर (Twitter) आणि अमेझॉन (Amazon) सारख्या कंपन्यात वर्क फोर्समध्ये नुकतीच मोठी कपात करण्यात आली आहे. तर मायक्रोसॉफ्टनंतर मध्येही कर्मचारी कपात करण्यात आली. आता गुगलही १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असून कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.
Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक (GOOGL.O) मध्ये सदर नोकरकपात केली जाणार आहे. या कंपनीमध्ये जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. अल्फाबेट (GOOGL.O) इंकमध्ये होणारी नोकरकपात टेक सेक्टरमध्ये मोठा झटका मानला जात आहे.
कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी म्हटले की, नोकरकपातीच्या निर्णयाची मी पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांनी म्हटले की, आमचे लक्ष्य कॉस्ट बेस कमी करणे आहे. तरटॅलेंट आणि भांडवलाला आमचे प्राधान्य राहणार आहे. गूगल अल्फाबेटमधील नोकरकपात ग्लोबल लेव्हलवर असेल. अल्फाबेटने संबंधित कर्मचाऱ्यांना ईमेल केले आहेत. तर अन्य देशांत स्थानिक रोजगार कायदा व नियमांमुळे प्रक्रियेला अधिक वेळ लागेल.
पिचई यांनी म्हटले की,’Googlers, माझ्याकडे तुम्हाला शेअर करण्यासाठी एका निराशाजनक बातमी आहे. आम्ही आपल्या वर्कफोर्समधून १२,००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्ही आधी अमेरिकेत प्रभावित कर्मचाऱ्यांना एक वेगळा मेल केला आहे. याचा अर्थ काही प्रतिभाशाली लोकांना अलविदा म्हणावे लागेल, ज्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही खूप मेहनत केली होती व ज्यांच्यासोबत काम करणे पसंत केले होते. मात्र यासाठी मी खेद व्यक्त करतो. आपण आम्हाला येथपर्यंत घेऊन आलात, या निर्णयांची जबाबदारी मी घेतो.
पिचई म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. त्यांना २०२२ चा बोनस आणि शिल्लक सुट्ट्यांचे पैसे मिळतील. त्याचबरोबर ६० दिवसांचे अतिरिक्त वेतन दिले जाईल. कंपनीने म्हटले की, Google मध्ये प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी १६ आठवड्यांचे वेतनासोबत दोन आठवड्यापासून सुरू होणारा एक सेवरेंस पॅकेजही अदा केले जाईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची हेल्थ सुविधा आणि नोकरी देण्यासाठी सहायता केली जाईल.