(रत्नागिरी)
जिल्ह्यात 6 मोटार ट्रेनिंग स्कूलनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवाना न घेताच मोटार ट्रेनिंग स्कूल चालवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ कायालयाला याबाबत माहिती कळताच कारणे ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यात 36 नोंदणीकृत मोटार ट्रेनिंग स्कूल कार्यरत आहेत. मोटार ट्रेनिंग स्कूल सेंटरनी 5 वर्षांनी एकदा परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. प्रशिक्षकांसाठीचे निकष प्रशिक्षकाकडे वाहन चालवण्याचे लायसन्स असावे. ड्रायव्हिंग ट्रेनिंगमधील अनुभव असावा. जागा स्वत:ची किंवा भाड्याची असल्याबाबतची कागदपत्रे अशा अटीचा समावेश आहे. मोटार ट्रेनिंग स्कूलच्या नूतनीकरणासंबंधी गेल्या काही महिन्यांपासून आरटीओला प्राप्त झालेल्या अर्जांवर आरटीओतील अधिकाऱ्याकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नूतनीकरण करावयाच्या मोटार ट्रेनिंग स्कूल चालकाने आवश्यक सर्व निकषांचे पालन केले आहे का, याची खातरजमा केली जात आहे. त्यानंतरच नूतनीकरण केले जात आहे.
मोटार ट्रेनिंग स्कूल मालकांचा खुलासा आल्यानंतर उपपादेशिक परिवहन कार्यालयमार्फत पुढील कारवाई होणार आहे. यामध्ये संबंधितांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.