(रत्नागिरी)
जिल्ह्यासाठी आरटीई अंतर्गंत शासनाकडून गेल्या तीन वर्षांत फक्त दोनवेळाच निधी प्राप्त झालेला आहे. सन 2018-19 पर्यंत शाळांना शंभर टक्के निधी प्राप्त झाला आहे. सन 2019-20 साली अवघा 17 टक्के निधी प्राप्त झाला आहे.
अजूनही जिल्ह्यासाठी पाच कोटींची थकबाकी शासनाकडे आहे. शासनाकडून एकूण पाच कोटी 15 लाख 28 हजाराचा निधी अपेक्षित आहे. शिक्षण विभागाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.