कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रत्येक पक्ष लोकांची मते मिळावित म्हणून प्रयत्नशील आहे. परंतू अशातच भाजप नेत्याचे एक वादग्रस्त वकत्व्य समोर आले आहे. भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गा येथील वीरशैव-लिंगायत सभेत धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की ‘आम्हाला एकही मुस्लिम मत नको,” दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.
"We don't want even a single Muslim vote," said BJP leader and former Karnataka minister KS Eshwarappa speaking on the issue of religious conversion at a Veerashaiva-Lingayat meeting in Shivamogga yesterday. pic.twitter.com/xe3v3M3Vdz
— ANI (@ANI) April 25, 2023