आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून पाली ग्रामपंचायत साठी जनसुविधा योजनेतून तब्बल 16 लाख निधी मंजूर झाला असून ग्रामस्थांनी आमदार शेखरजी निकम यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच माजी सभापती शौकत मुकादम यांचे हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
पाली गावाला ग्रामपंचायत नसल्याने कुठे बसायचे याची समस्या होती त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सभांचे व कार्यालयीन कामकाज चालू असे ग्रामस्थांचे स्वप्न होते कि गावामध्ये एक सुसज्ज चांगली ग्रामपंचायत असावी आणि हे स्वप्न आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे सरपंच अजय महाडिक म्हणाले तसेच निकम साहेब आमदार झाल्यानंतर गावाच्या स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता गेली अनेक वर्ष रखडला होता सदर रस्त्याच्या 10 लाख मंजूर झाले आहेत.पाली गावाच्या विकासासाठी मनापासून लक्ष देत आहेत याचा आम्हा पाली ग्रामस्थांना अभिमान आहे.
या भूमिपुजन सोहळ्यासाठी आमदार शेखर निकम, माजी सभापती शौकत मुकादम, सरपंच अजय महाडिक, नंदकुमार महाडिक, विलास महाडिक, सचिन गमरे, सीताराम घाडगे, बावा सुर्वे, राजू शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र महाडिक, पूनम गमरे, अर्पिता महाडिक, विकास मोहिते, प्रमोद सुर्वे, सुभाष महाडिक, सूर्यकांत महाडिक, प्रमोद महाडिक, ग्रामसेविका स्वप्नाली चांदे आदी मान्यवर उपस्थित होते.