(चिपळूण /ओंकार रेळेकर)
आमदार शेखर निकम यांचे हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कालुस्ते बुद्रुक चे उदघाटन संपन्न झाले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जिल्हा परीक्षा सदस्य मिनल काणेकर, माजी उपसभापती पांडूशेठ माळी यांचे विशेष प्रयत्न देखील लाभले असे आमदार निकम म्हणाले. कापरे उपकेंद्राला अनेक पुरस्कार मिळाले असून काळुस्ते केंद्राचे काम उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर त्यांनी कर्मचारी वर्गाची देखील प्रशंसा केली. या गावातील सरपंच रामकृष्ण कदम, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक, गावातील ग्रामस्थ यांचेमुळे हे शक्य झाले, यापुढेही चांगले कार्य या उपकेंद्रातून पाहायला मिळेल असे आमदार म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मिनल काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य पांडूशेठ माळी व सुनिल तटकरे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, ज्योती यादव आरोग्य अधिकारी, रमेश कादवाडकर, अभिजित जाधव, अशोक जाधव, कांबळे, कालुस्ते सरपंच रामकृष्ण कदम, कालुस्ते सरपंच दाऊद परकार, भिले सरपंच आदिती गुढेकर, प्रदीप कदम, जमीर पटेल, लतिफ परकार, रामदास कदम, शशिकांत साळवी, आदी मान्यवर, ग्रापंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.