(खेड)
राज्याच्या राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून खळबळ उडवली आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे शिंदे यांच्या समर्थक गटामध्ये सामील झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कदम यांच्या समर्थनार्थ तालुका शिवसैनिक प्रतिक्रिया देत असले तरी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी खेड शहर परिसरात ठाकरेंच्या समर्थनार्थ शहरात ठिकठीकाणी फलक लावले आहेत. त्यामुळे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात अजिंक्य मोरे मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील शिवसैनिक आमदार योगेश कदम यांच्या सोबतच राहतील, असा ठराव झालेल्या कार्यकारणीच्या एकमुखाने करण्यात आलेला आहे. मात्र, युवासेना आता मैदानात उतरली आहे.