कोरोनाग्रस्त ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांना आवश्यक असतो तो ऑक्सिजन. मात्र कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऐन वेळी ऑक्सिजन सिलेंडर संपले आणि ऍडमिट असलेले कोव्हीडबाधित रुग्ण अत्यवस्थ झाले. 2 मे रोजी ऐन रात्रीच्या वेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ आमदार नितेश यांनी 2 जम्बो सिलेंडर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आपल्या कार्यकर्त्यांमार्फत रात्री साडे दहा वाजता पोच केले.
अगदी गोल्डन अव्हर मध्ये उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन सिलेंडरमुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांचे प्राण वाचले. आमदार नितेश राणे यांनी कोरोना च्या महामारीत अत्यावश्यक ठरणारे 100 पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर याआधीच स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत. तर जिल्ह्यात असलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावू नयेत, यासाठी आणखी 25 जम्बो सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी ऐन वेळी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन सिलेंडर मुळे आपल्या नातेवाईकांचे प्राण वाचल्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.