(मुंबई)
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून उदय सामंत आणि दादा भुसे याची कामकाज सल्लागार समितीसाठी नावांची शिफारस करण्यात आली होती. ती विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. यावेळी ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या पत्राची शिफारस विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली लावली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.
शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये शिवसेना अधिकृत पक्ष असून आपल्याला कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासंबंधी कोणतंही पत्र दिलं नसल्याचं म्हटलं होतं. ही कृती बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचंही या पत्रात म्हटलं होतं. नियमानुसार आपल्याला अधिकृत शिवसेना म्हणून या समितीच्या बैठकीस निमंत्रित करावं असं या पत्रात म्हटलं होतं.
अशाच आशयाचं एक पत्र शिंदे गटाकडूनही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या विनंतीनुसार विधानसभा अध्यक्षांनी उदय सामंत आणि दादा भूसे यांची कामकाज सल्लागार समितीवर नियुक्ती केली.