(संगमेश्वर / प्रतिनिधी )
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र शिल्पकला महाविद्यालय कोकणातील दृकलेचे एक अग्रगण्य कला महाविद्यालय असून सामान्य नागरिक कलारसीक कला विद्यार्थी कलाकार या उपक्रमांमार्फत कलेचा आनंद व आस्वाद घेतील म्हणून दरवर्षी महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम म्हणजे आपकी अमरी हे चित्रकर्त्री अमृता शेरगील यांच्या जीवनावर आधारीत हिंदी नाटकाचा प्रयोग चिपळूण येथे सादर करण्यात येणार आहे .
जागतिक क्षेत्रातील १९३२ ते १९४१ या कालावधीतील सुप्रसिद्ध भारतीय चित्रकर्ती अमृता शेरगील यांच्या जीवनावर आधारित शेखर नाईक दिनदर्शित “आपकी अमरी” हे हिंदी नाटक १७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाच्या तिकीट विक्री शुभारंभ नुकताच सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तरी जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी केले आहे.