(नवी दिल्ली)
देशात आधारकार्ड वापरण्याबाबत जनजागृतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यासोबतच फसवणुकीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. नुकतीच एक माहिती समोर आली होती की, सरकार प्रत्येक आधार कार्ड धारकाला 80 हजार रुपये देणार आहे, असा मेसेज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आधारकार्ड धारकाला 80 हजार रुपये मिळणार, अशा स्वरुपाचा फिरणारा मेसेज हा फेक असून अशा कोणत्याही अफवा, थापांना बळी पडून नका, अशी माहिती केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या “फॅक्ट चेक” टीमने दिली आहे. सरकार आधार कार्डधारकांना 80 हजार रुपये देणार, असे सांगणारे व्हिडीओ व संदेश व्हायरल होत आहेत. मात्र, ते फेक असून कोणालाही फाॅरवर्ड करु नका, असे या टीमने स्पष्ट केले आहे.