( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील आदर्श ओरी गावातील श्री. ग्रामदेवता मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दिवसभर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे.
श्री ग्रामदेवता ओरी या ग्रामदेवता मंदिर वर्धापन दिनी १५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रींची पूजा, अभिषेक, आरत्या, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद , महिलांचा हळदी कुंकू समारंभ, लकी ड्रॉ सोडत, भजन, भोवत्या व आरत्या, अल्पोपहार, चित्रफित व मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच रात्री १०.३० वाजता अग्निपथ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
या नाटकाचे लेखक जगन्नाथ शिंदे असून संतोष कुवार (बावा) यांनी दिग्दर्शन केले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ओरी मधलीवाडी येथील गावकर शंकर शेवडे, सुधाकर घवाळी यांनी ग्रामस्थांच्यावतीने केले आहे.