बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड म्हणून ओळखली जाणारी बिसलेरीची सुरुवात फार्मास्युटिकल कंपनी म्हणून झाली होती. या कंपनीचे संस्थापक इटालियन व्यापारी फेलिस बिसलेरी आधी मलेरियाची औषधं विकायचे. फेलिस बिसलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिसलेरीला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. भारतात डॉ. रॉसी यांनी वकील खुशरू संतकू यांच्या सहकार्याने बिसलेरी सुरू केली.
१९६९ मध्ये, बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी अवघ्या चार लाख रुपयांना विकत घेतली होती. तेव्हापासून या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नसल्याने त्यांनी हा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. आता ही कंपनी टाटांनी विकत घेतली आहे.