(मुंबई)
सध्या अनेक राजकारण्यांना अयोध्या दौऱ्याचे वेध लागले आहेत. तर काही जण या दौऱ्याच्या निमित्ताने आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच एसटी संप प्रकरणी कामगारांची कायदेशीर बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील हे दोघे आता अयोध्येला जाणार आहेत.
आम्ही दोघे अयोध्या प्रकरणी न्यायालयीन प्रकरणात वकील म्हणून कार्यरत होते, आता आम्हा दाम्पत्याला अयोध्येत बोलवणे आले आहे. त्याप्रमाणे आम्ही दोघे डंके की चोटपे अयोध्येत जाणार आहोत, अशी घोषणा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आमच्या कष्टकरी जनसंघाचे अयोध्येत साधू-संत स्वागत करणार आहेत, हे समजल्यावर काहींच्या जमिनीखालची जमीन घसरली आहे, म्हणून माझ्या विरोधात नोटीस पाठवली गेली आहे. ‘डंके की चोट पर’ आम्ही नोटीसला कायदेशीर उत्तर देणार आहोत, असे वकील सदावर्ते म्हणाले. आमच्याबरोबर काही एसटीचे कर्मचारी हेही ‘डंके की चोट पर’ अयोध्येत येणार आहेत, असे ते म्हणाले.
तर सदावर्ते यांना पाठवलेल्या कलम ११० अंतर्गत पाठवलेल्या नोटीसवर बोलताना सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, ज्या दिवशी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता तेव्हा, सदावर्ते मॅट च्या न्यायालयात युक्तीवाद करत होते. अशी माहिती न्यायालयाला दिली आहे. या नोटीसवर न्यायालयात उत्तर देण्यासाठी आम्हाला अवधी देण्यात आला आहे.