न्यूरालिंकचे हे ब्रेन इम्प्लांट तंत्रज्ञान अनेक प्रकारे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मेंदूमध्ये चिप टाकून अनेक रुग्णांना खूप मदत होऊ शकते. ही चाचणी यशस्वी झाल्यास अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार आहे. अर्धांगवायूचा त्रास असलेले रुग्ण विचार करू शकतील आणि मोबाईल आणि संगणक ऑपरेट करू शकतील. जे लोक मानसिकदृष्ट्या सक्षम नाही अशांसाठी हे वरदान ठरेल. एलोन मस्क यांना त्यांच्या तंत्रज्ञानावर इतका विश्वास आहे की, त्यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की ते त्यांच्या मुलांच्या मेंदूमध्ये ही चिप रोपण करण्यास तयार आहेत.
एलोन मस्क यांनी 2019 मध्ये सांगितले होते की, 2022 पर्यंत, न्यूरालिंकला मानवी चाचण्यांसाठी एफडीएकडून मंजुरी मिळेल. याआधी एफडीएने एलोन मस्कचा अर्ज अनेकदा नाकारला आहे. न्यूरालिंकबाबतची एफडीएची सर्वात मोठी समस्या ही चिपमधील लिथियम बॅटरी आहे. एफडीए म्हणते की, ब्रेन चिपची बॅटरी कोणत्याही कारणाने लीक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. न्यूरालिंकच्या चिपसोबत सर्वात मोठे आव्हान म्हणजे मेंदूच्या पेशी.
न्यूरालिंकने या चिपची माकडांमध्ये यापूर्वी चाचणी केली आहे. न्यूरालिंकने याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यात दावा केला होता की माकडाच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते संगणकावर गेम खेळू लागले. न्यूरालिंकच्या या चाचणीत कंपनीने माकडाला इजा केली नाही ना, तसेच मेंदूमध्ये चीप व्यवस्थित बसवली होती का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, न्यूरालिंकने नाण्यांच्या आकाराचे उपकरण तयार केले आहे, त्याला लिंक असे नाव देण्यात आले आहे. या चिपद्वारे संगणक, मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही उपकरण थेट मेंदूच्या क्रियाकलाप (न्यूरल इम्पल्स) द्वारे नियंत्रित करण्यास सक्षम होते. एलोन मस्क ज्या तंत्रज्ञानाद्वारे चिप्स बनवत आहेत त्याला ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस किंवा थोडक्यात BCIs म्हणतात. इतर अनेक कंपन्याही यावर वर्षानुवर्षे काम करत आहेत.