( सुंदर पाटणकर / राजापूर)
सन 1975 ते 1977 या कालावधीत पुकारण्यात आलेल्या आणीबाणी विरोधात व लोकशाही संरक्षण साठी सत्याग्रह व मिसखाली राजापुरातील तुरुंगात भोगावा लागला होता. या व्यक्तींना आता सरकारतर्फे सन्मान निधी प्राप्त झाला आहे. या सर्व लोकतंत्र सेनानी व मयत सेनानी यांच्या पत्नीनी आज उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी श्रीमती माने म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण मला कधीही भेटू शकता असे आश्वासन दिले.
दरम्यान मनसेचे माजी तालुकाध्यक्ष सुनील जठार यांनी घडवून आणलेल्या या भेटीत माने यांनी सेनानींची आपुलकीने चौकशी करून कोणत्याही अडचणीत आपण आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे राजापूर तालुकाध्यक्ष दामोदर गाडगीळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दत्तात्रय रानडे, खजिनदार गोपाळकृष्ण रायकर, विजय भावे, प्रकाश आमकर, सूर्यकांत कातकर, अनिरुध्द ठाकूर, श्रीम. निर्मला मधुसूदन बोरवणकर, श्रीम. भक्ती भालचंद्र नवरे, श्रीम. जयश्री जगन्नाथ घुमे, सुनिल जठार आदीजण उपस्थित होते.