(पाचल /तुषार पाचलकर)
पाचलचा आठवडा बाजार हा तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, आज या दिवसाचं औचित्य साधून सौ स्वाती सुरेश सावंत या मॅनेजमेंट पाहत असलेल्या पाचलच्या बाजारपेठेत नव्याने सुरु करण्यात आलेल्या “पाचल पंचक्रोशी” या बाजाराचे” उद्घाटन माजी उपसरपंच श्री किशोर नारकर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर पाचल गावचे विद्यमान उपसरपंच श्री आत्माराम सुतार यांच्या हस्ते फीत कापून झाले.
यावेळी पाचल गावच्या माजी सरपंच सौ. अपेक्षा मासये,माजी जि.प.सदस्य मोहन काका नारकर, पत्रकार सुरेश गुडेकर, अनाजी मासये सर, श्री जयदीप सुतार सर, श्री सुरेश सावंत या मान्यरांसोबत अनेक ग्रामस्थ या उदघाटन सोहळ्याला उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील पाचल गावची बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते, अनेक प्रकारची दुकानं असलेल्या या बाजारपेठेत सर्व प्रकारचे साहित्य, कडधान्य, गृहपयोगी वस्तू याठिकाणी उपलब्ध आहेत, त्यामुळे जवजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावचे लोकं या बाजारपेठेत खरेदीसाठी येतात.
पाचल च्या बाजारपेठेत सुरेश तेलंगांचे बाळकृष्ण अँड कंपनी, राजू लब्दे यांचे श्रीराम स्टोअर,उदय सक्रे यांचे सिद्धिविनायक कटपीस सेंटर, जितू गांगण यांचे स्टार नोव्हेल्टी,बाळा पाथरे यांचे जाखमाता हार्डवेअर, संजय पाथरे यांचे साई ट्रेडिंग कंपनी, भरत पटेल यांचे उमिया ट्रेडिंग कंपनी, सुरेश ऐनारकर यांचे जय समर्थ कृपा हार्डवेअर, सह दोन गॅस एजन्सी तसेच तीन सेतू कार्यालय,नऊ मेडिकल,सात परमिट रूम तीन बिअर शॉपिं व काही ताडी माडीची दुकानं आहेत.
याबरोबर न्यू प्रकाश, हॉटेल्स वैभव, हॉटेल सफा, प्रभा किचन अश्या प्रकारची आठ ते दहा हॉटेल्स कित्येक जनरल स्टोअर या बाजारपेठेत ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. अश्या या झपाट्याने विकसित होतं असलेल्या बाजारपेठेत आपला बाजार व के. टी. मार्ट असे दोन सुपर बाजार देखील आहेत. त्यामुळे “पाचल पंचक्रोशी” बाजाराचे मॅनेजमेंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणकोणत्या योजना उपलब्ध करून देतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागलं आहे.