(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात एन. एस. एस. विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रात्यक्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध योगासने व योग क्रियांचे प्रकार सादर केले. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत ऐश्वर्या सागर गुरव हिने प्रथम क्रमांक, तर आर्यन दीपक पंडित व अश्विनी विष्णु धामणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे परीक्षण डाॅ. मयुरेश राणे यांनी केले. स्पर्धेचे आयोजन एन. एस. एस. विभागाच्या प्रमुख प्रा. सीमा शेट्ये व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. सीमा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. सानिका भालेकर यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डाॅ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे यांनी विजयी स्पर्धकांचे व उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.